जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा पदाची द्वितीयर्षपूर्ती झाली.आदरणीय पवार साहेबांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिल्यानंतर पहिले वर्ष निवडणुका, सत्ता-स्थापना, कोरोना आपत्ती या सर्व महत्वाच्या घडामोडींमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या वर्षात संघटनात्मक बांधणी, कोव्हीड काळातील मदतकार्य, स्थानिक स्वराज निवडणुकांची मोर्चेबांधणी या संघटनात्मक घटनांनी भरगच्च असे गेले.
या काळात अनेक नवीन सहकारी या प्रवासात सोबत जोडले गेले. संपूर्ण संघटना मिडीयाच्या माध्यमातून उत्तमरित्या जोडली गेली. वेळोवेळी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे आणि पक्षाच्या इतर सर्व जेष्ठ मंडळींच्या सल्ल्यानुसार पक्षाची सर्वच बाबतीत वेळोवेळी बहुमोल असे मार्गदर्शन केले. गावोगावी खेडोपाडी राष्ट्रवादी घरोघरी यांसारख्या अभियानाच्या माध्यमातून पक्ष अगदी लहानात लहान गाव-वस्ती पर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे.
सर्वसामान्य, तळागाळातील निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांनी यावेळी मोलाची साथ दिली. वरिष्ठांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. पक्षातील सर्वच सहकाऱ्यांनी मनापासून साथ दिली. आजवर केलेल्या कामांचा अनुभव गाठीशी असतांना येत्या काळात सुध्दा पक्षवाढीसाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व उपक्रम करण्याचा दृढ संकल्प आहे . आपल्या सर्वांचे प्रेम नेहमी असेच वृद्धींगत होत राहो.

