श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा चे उपप्राचार्य बबनराव रंगनाथ लावंड सेवानिवृत्त झाल्याबद्दल मच्छिंद्र पवार मित्रपरिवार यांच्या वतीने विशेष सन्मान सोहळा संपन्न.
इंदापूर:(४ जुलै २०२१) हसतमुख विनोदी विचारातून मंत्रमुग्ध करून विद्यार्थ्यांना विद्याअभ्यास शिकवणारे शैक्षणिक वेळेनुसार असणारा तास विद्यार्थ्यांना झाला आहे तो समजून सुद्धा न देणारे दिलदार मनाचे इंग्रजी विषयात निपुण असणारे प्राध्यापक लावंड सर म्हणून ज्यांची ओळख असणारे शिक्षक ३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवानिवृत्त सोहळा असंघटित कामगार काँग्रेस इंदापूर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पवार व रेडा ग्रामपंचायत सदस्या राजश्री मच्छिंद्र पवार यांच्या पवार मित्र परिवाराच्या वतीने संपन्न झाला.
रंगनाथ लावंड रा. रुई यांचे सुपुत्र बबनराव रंगनाथ लावंड यांचा जन्म दिनांक ३१/१०/१९६३ साली झाला यांचे शिक्षण एम ए.बी एड ,डी एस एम पर्यंत झाले आहे. लावंड सर हे प्रथम शिक्षक म्हणून शिवभूमी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खेड शिवापुर तालुका हवेली या ठिकाणी १९८८ ते १९९३ पर्यंत पाच वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते जुलै १९९३ ते जून २०२१ या कालावधीमध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा या ठिकाणी २८ वर्ष ८ महिनेचा काळामध्ये शिक्षक म्हणून कार्यकाळ पूर्ण केला .याच कालावधीमध्ये त्यांना पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे यांच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार याने त्यांना सन्मानित करण्यात आले.
सदर काळात शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रात रुई गावातून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पद २००२ ते २०१५ पर्यंत सलग तेरा वर्ष संचालक म्हणून काम पाहिले.
लावंड सर यांच्या कौटुंबिक जीवनात सदैव साथ देणाऱ्या मनमिळाऊ स्वभावाच्या त्यांच्या पत्नी सौ मंजिरी लावंड यांचा त्यांच्या यशस्वी जीवनात अनमोल असा सहभाग असून या दाम्पत्यांना वृषाली लावंड आणि ऋतुजा लावंड या उच्चशिक्षित संस्कारित मुली त्यांच्या जीवनात आहेत. त्याच बरोबर त्यांच्या आई गोदाबाई रंगनाथ लावंड यांचा आजही शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे.
यावेळी मच्छिंद्र पवार म्हणाले की, लावंड सर हे शिक्षकी पेशा मध्ये जसे तरबेज आहेत तसेच राजकीय कार्य क्षेत्रातही उत्तम रित्या तरबेज आहेत त्यांच्या खास शैली चे इंदापूर तालुक्यातील जनतेला वेळोवेळी दर्शन दिसून आले आहे .ते स्पष्ट आणि प्रामाणिक स्वभाव असणारे व आमच्या सुख-दुःखात नेहमी धावून येणारे एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या आदर्श मुळे जीवनामध्ये शिक्षक म्हणून कार्यकाळात ३० जून २०२१ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा या सेवानिवृत्ती निमित्त मी माझ्या सहकुटुंब सहपरिवार यांच्या वतीने सेवा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व्यक्त करून पुढील जीवनास आनंदमय शुभेच्छा व्यक्त करतो.
या प्रसंगी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. तानाजीराव देवकर, माजी सचिव जीवन फडतरे, दत्तात्रय दडस सर . शिवाजी चव्हाण,सौ. मंजिरी लावंड,मच्छिंद्र पवार , सौ. राजश्री पवार, ऋषिकेश (बंटी) पवारआदी उपस्थित होते.

