इंदापूर येथे प्रा. कुणाल काळे यांच्या विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमीचा शुभारंभ.
सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत शिक्षण देणाऱ्या दालनाचा इंदापूर नगरीत प्रारंभ.
इंदापूर:इंदापूर येथे प्राध्यापक कुणाल काळे यांच्या विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी चे उद्घाटन समारंभ रविवार दि. ०४ जुलै २०२१ रोजी सकाळी १०:३० वाजता कुणाल काळे सरांचे आई वडील श्री दादासो अनंता काळे(निवृत्त जलसंपदा अधिकारी) व मीनाताई काळे यांच्या शुभहस्ते अकलूज नाका अरुण गॅलेक्सी इंदापूर या ठिकाणी उद्घाटन संपन्न झाला. बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल मखरे, कुस्तीगीर संघाचे महिंद्र रेडके, धनाजी पाटील व इतर मान्यवर आणि अकॅडमीचे सेक्रेटरी प्रा. काळे मॅडम, प्रा एम यमगर प्रा. कोकरे प्रा ननवरे प्रा के पांढरे प्रा ठोंबरे आणि विद्यार्थी पालक मित्र मंडळी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक कुणाल काळे सर म्हणाले की, इंदापूर शहर व परिसरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सी बी एस ई, एनसीईआरटी स्टेट बोर्ड सिलेबस आज पासून सुरू करत असून रेगुलर क्लास तसेच स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पायाभूत कोर्स राज्य ,केंद्र स्तरावरील स्पर्धा परीक्षा, बँक स्पर्धा परीक्षा, नवोदय स्कूल, सैनिक स्कूल स्पर्धा परिक्षा इत्यादी सर्व परीक्षांचा 100% पाया पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे तेव्हा विद्यानिकेतन व प्रोफेशनल अकॅडमीच्या एकाच छताखाली तांत्रिक शक्ती व आत्मविश्वासाचा विकास विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी ची उभारणी केली आहे .आज पासून इंदापूर नगरीत त्याचा शुभारंभ केला असून विद्यार्थी व पालक यांनी त्याचा लाभ घ्यावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी पुढे प्रा कुणाल काळे यांनी उपस्थित पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, इंदापूर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा मानस आहे त्यामध्ये येऊ घातलेली नवीन शिक्षण प्रणाली राबवायचे आहे त्याच बरोबर कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल कोविंड १९ च्या महामारी मुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची रुची लावण्याचे कार्य आम्हीची अकॅडमी करणार आहे . यावर्षी नवोदय परीक्षकेंद्र इंदापूर तालुक्यामध्ये चि. धम्मान्वय भीमराव चंदनशिवे याने आमच्या विद्यानिकेतन अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले . अकॅडमी च्या वतीने ११वी,१२ वी ग्रेट इंटिग्रेटेड सायन्स कोर्स सुरू झालेला आहे. त्याच बरोबर सैनिक स्कूल स्पर्धा परिक्षा बँक स्पर्धा यांच्याही अकॅडमीच्या मार्फत मार्गदर्शन करणार आहोत.
अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी सदिच्छा भेट देऊन अकॅडमी च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा. ठोंबरे यांनी केले. त्याच बरोबर , प्रा. कोकरे, प्रा.ननवरे, प्रा .पांढरे यांनी आपल्या विषयातील भविष्यातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य पालकांनी उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा कोकरे यांनी केले

