shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी

नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील यांचेकडून नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी
निवडीबद्दल केले अभिनंदन 
            - विविध विषयावरची चर्चा
फोटो :- नवी दिल्ली येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या व विषयांवरती चर्चा केली.
           - 
इंदापूर:प्रतिनिधी (दि. १६ जुलै २०२१)
       भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील नूतन केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या भेटीत नूतन केंद्रीय मंत्र्यांशी हर्षवर्धन पाटील यांनी विविध विषयांवरती चर्चा केली. 
          नवी दिल्ली येथे बुधवार व गुरुवारी (दि.१५) हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या नूतन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी या सर्व नेत्यांची हर्षवर्धन पाटील यांची विविध विषयावरची चर्चा झाली. या चर्चेत राज्यातील विकास कामांसाठी व भाजप पक्षवाढीसाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली. दरम्यान, ना.नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत पालखी मार्गांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचबरोबर विविध रस्ते, पूल, भुयारी मार्ग यांच्या कामासाठी मागणी केल्यानंतर तात्काळ निधी उपलब्ध करून दिलेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. 
________________________________

close