shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बोअरच्या खर्चाच्या पैशावरून केज चिंचोली माळी शिवारात काठीने डोके फोडले..!!

प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :
पाण्याच्या बोअरच्या खर्चाच्या पैशावरून एकाचे काठीने डोके फोडल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ जुलै रोजी सकाळी ११:३० वा. च्या दरम्यान सतीश रोडे हा चिंचोली पाटी जवळील त्याच्या शेतात असताना रंगनाथ रोडे हा याच्या जवळ आला. त्याने सतीश रोडे यास बोअर खोदण्यासाठी झालेल्या खर्चाचे अर्धे पैसे मागितले आणि शिवीगाळ करून लाकडी काठीने सतीश रोडे याच्या कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच लाथाबुक्याने मारुन मुक्कामार देत जिवे मारण्याची धमकी दिली.  

सतीश रोडे याच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रंगनाथ रोडे रा. केज याच्या विरुद्ध गु.र.नं. ३५१/२०२१ भा.दं.वि. ३२४, ३२३, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला जमादार रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.
close