नगर प्रतिनिधी-(शिवा म्हस्के):
(दि.१६ )जुलै :- कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने आदिवाशी विकास विभाग महाराष्ट्र राज्य एकात्मिक आदिवासी प्रकल्प राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुंडेगाव येथे खावटी अनुदान योजना अंतर्गत अन्नधान्य किराणा वाटप कार्यक्रम राबविण्यात आला होता.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पन्नास टक्के म्हणजे दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तर उर्वरीत पन्नास टक्के अंतर्गत धान्य किराणा स्वरुपात खावटी कीट देण्यात आले.या खावटी अनुदान योजनेंतर्गत असलेली कीट ही आदिवासी लाभार्थ्यांसाठी किराणा स्वरुपात असल्याने किटमध्ये बारा वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे.यात मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तर डाळ, साखर, शेंगदाने तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ, चहापत्ती या वस्तूंचा समावेश आहे.
असे यावेळी गुंडेगावच्या सरपंच मंगलताई सकट यांनी सांगितले.यावेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते माऊली कुताळ यांनी भविष्यात सर्व आदिवासी समाजासाठी हक्काचे घर मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करुन घरे मिळवून देऊ असे सांगितले यावेळी कार्यक्रमाला उपस्थितांमध्ये ज्येष्ठ नेते बबनराव हराळ पाटील, ग्रामपंचायत सदस्य साधना सतीश चौधरी,भाऊसाहेब हराळ, सतीश चौधरी, शिवसेना नेते सत्यवान कोतकर, वसंत भापकर, संतोष सकट,आदी ग्रामस्थ उपस्थित होते

