shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सभापती प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश !!


माजी सभापती प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश !!
इंदापूर:बावडा गावाचे जेष्ठ नेते व पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील यांनी  (दि.१६ जुलै) रोजी  उपमुख्यमंत्री  नामदार अजित पवार , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  नामदार दत्तात्रय भरणे  तसेच जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला .
प्रशांत पाटील हे इंदापूर तालुक्यातील राजकारनातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी  स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्थांवर काम केले असुन प्रशासनाचा  अनुभव त्यांच्याकडे आहे.

प्रवेश झाल्यानंतर पाटील म्हणाले की, अजित पवार व सुप्रियाताई सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करत असून येणा-या काळात राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तालुक्यात सुध्दा असंख्य जुन्या जाणत्या सहका-यांना राष्ट्रवादी च्या प्रवाहात आणणार .

या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,विजय बापू घोगरे,नवनाथ  रूपनवर, मार्केट कमिटीचे संचालक शिवाजीभाऊ इजगुडे, सचिनभाऊ देवकर-पाटील तुकाराम घोगरे,विद्यासागर घोगरे,रविराज घोगरे,अभिजीत घोगरे,अशोक चव्हाण,उल्हास घोगरे,शितल कांबळे, जिग्नेश कांबळे,नाना कांबळे,हनुमंत गायकवाड,जालिंदर भिसे, सचिन काटकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
close