प्रतिनिधी :बाबासाहेब तिपुळे
सारोळा बद्धी : (दि .१६) : तालुक्यात गाव तिथे लसीकरण मोहिमे अंतर्गत तालुक्यातील सारोळा बध्दी येथे पंचायत समितीचे मा. सभापती इजि. प्रविण दादा कोकाटे यांच्या नियोजनातुन लसीकरण कॅम्प करण्यात आला होता
यावेळी गावातील नागरिकांचा 84 दिवस पुर्ण होऊन दुसरा ङोस घ्यायचा बाकी होता अशा नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण पुर्ण करण्यात आले त्यानंतर उरर्वरित वय वर्षे 18 चे पुढील ग्रामस्थांचे आॅनलाईन प्रक्रिया पुर्ण करून पहिला ङोस देण्यात आला.
सदर कॅम्प दरम्यान उपस्थितासाठी नाष्टाची सोय सरपंच यांनी केली यावेळी गावचे सरपंच श्री. सचिन लांङगे उपसरपंच हिराबाई हजारे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश बोरूङे,सी एच ओ.दातीर माॅङम, आरोग्य सेवक वाघमारे, आरोग्य सेविका सरोजिनी देठे, बिङवे सिस्टर आशा सेविका बोरूङे माॅङम, अंगणवाडी सेविका शेलार, दळवी, ग्रामसेवक सुरज एकसिंगे जि.प.शाळा. मुख्याध्यापक साठे सर, कानिफ ससे, निलेश बोरूङे, भरत म्हस्के, कांबळे सर, गायकवाड माॅङम, ग्राम.कर्मचारी आदिंनी कॅम्स यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

