shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथे १८ जुलै रोजी रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन.!!

राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे वतीने रविवार १८ जूलैला रक्तदान शिबीर, कोवीड योद्धा सन्मान पञ वितरण तसेच संघातील पत्रकारांना विमा पाॅलिसी वितरण या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी दिली.


राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथील योगा केंद्र येथे रविवारी सकाळी दहा ते दोन या वेळेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष चिंधे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा, जेष्ठ पत्रकार सुभाष मुदळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.                                    

बातम्या आणि जाहिराती करीता संपर्क दिपक हरिश्चंद्रे ,राहुरी (तालुका प्रतिनिधी )7350591600
close