shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न..!!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
आयुष्यमान अण्णासाहेब दाभाडे यांच्या राहत्या घरी वर्षवास कार्यक्रम पुणे येथे पाली भाषेचे अध्ययन करीत असलेले  आदरणीय भंतेजी सुमेधजी बोधी यांच्या हस्ते विधीवत पूजेने संपन्न झाला वर्षावास निमित्ताने आदरणीय भंतेजींनी धम्मदेसना दिली धम्मदेसना मध्ये वर्षा वासाचं महत्त्व काय ,वर्षावास म्हणजे काय, वर्षा वासात काय काय बुद्धधम्मामधे करतात ,त्याची माहिती, बुद्ध धम्मा मध्ये दान पारमिता ला काय महत्व आहे.

 दानामध्ये सर्वश्रेष्ठ दान काय , यासंबंधी उपासक-उपासिका बाल बालिका यांना आपल्या सुमधुर वाणी मधून देसना देतांना खूप चांगल्या प्रकारे बौद्ध धर्माचे नियम आणि आपल्या जीवनशैलीमध्ये वेळोवेळी काय बदल करायला हवा याबाबत अवगत केले.त्याच प्रमाणे दत्तनगर येथील तक्षशिला बुद्ध विहार त्या ठिकाणी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या वाचनाची सुरुवात भंतेजींनी  केली.

याप्रसंगी दोन्ही कार्यक्रमांमध्ये आयुनी सुशीला सात दिवे, परीघाबाई ,छायाताई दाभाडे ,हिराबाई दाभाडे ,सुनंदा खरात ,मस्के ताई ,शिरसाठ ताई भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहिरेताई ,अलका गायकवाड ,प्रतिभाताई पवार, रत्नमाला गायकवाड ,अलका गायकवाड, छायाताई पवार त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे नगर उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुगंध राव इंगळे, मेजर कृष्णा सरदार, बौद्धाचार्य रवींद्र घोडके, अहमदनगर व अण्णासाहेब दाभाडे उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुनी, सुनीताताई दाभाडे यांनी तर आभार प्रदर्शन मेजर कृष्णा सरदार यांनी केले.
close