अहमदनगर । प्रतिनिधी :
कोरोनाच्या विषाणू प्रादुर्भावाच्या आपात्कालीन परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेक खाजगी रुग्णालये शासकीय नियम जुगारुन रुग्णांकडून अवाजवी बिल उकळीत आहेत या विरोधात जनआरोग्य फाऊंडेशन सर्वसामान्य रुग्णांना प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करुन जास्तीच्या बिलाचा परतावा मिळवून देत आहे.
कोरोना रुग्ण व नातेवाईकांना जास्तीच्या बिलांचा परतावा मिळवून देत असताना 'शासकीय काम नी सहा महीने थांब' ह्या म्हणीस अपवाद ठरत कार्यतत्पर आधिकारी मा. पल्लवी निर्मळ या रुग्णांना जास्तीच्या बिलांचा परतावा मिळवून देत आहेत व सर्वसामान्य रुग्णांना मदत करत आहेत.यामुळे जनआरोग्य फाऊंडेशन आणि रुग्णांच्या नातेवाईकांतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जनआरोग्य फाऊंडेशन चे प्रदेशाध्यक्ष मा. योगिराज धामणे प्रदेश संघटक मा. योगेश पिंपळे , सामाजिक कार्यकर्ते मा. शिवहरी म्हस्के , अंजना फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. ऋषीकेष इवळे , युथ २४ चे संपादक मा. सब्बील सय्यद , मा.शिवाजी लोखंडे आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

