शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राहाता येथील गोरे हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. किरण गोरे यांनी व्हेरिकोज व्हेन्स (पायांच्या फुगलेल्या नसा) जर्मन लेझर टेक्नॉलॉजीद्वारे बिनाटाका ऑपरेशन करण्याची अनोखी पद्धत जिल्ह्यात प्रथम सुरू करून ६० रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहे.
या आजाराची पायाच्या नसा फुगणे, पायाला सूज येणे, रक्तस्राव होणे, पाय काळे पडणे, चालण्याचा त्रास होणे, पायाला. जखम होणे. अशी विविध प्रकारची लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या आजाराची लक्षणे असणारे जिल्ह्यात अनेक रुग्ण आहेत. परंतु त्यांना उपचार करण्यासाठी मुंबई, पुणे याठिकाणी जावे लागते. जिल्ह्यात प्रथमच डॉ. किरण गोरे यांनी राहाता येथील गोरे हॉस्पिटल येथे व्हेरिकोज व्हेन्स या रुग्णांकरिता उपचार सुरू केल्याने जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या व्यतिरिक्त दुर्बिण तपासणीद्वारे पोटाचे विकार, मुळव्याध फिशर, हर्निया, सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे असे विविध उपचार डॉ. किरण गोरे व डॉ. अश्विनी गोरे हे राहाता येथे रुग्णांसाठी करीत आहेत.
व्हेरिकोस व्हॅन्स या आजारापासून रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा, यासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून विना टाका वेदनारहित शस्त्रक्रिया करून ६० रुग्णांवर यशस्वी उपचार केला आहे. यासाठी रुग्णांना ॲडमिट होण्याची गरज नाही.
- डॉ. किरण गोरे

