शिर्डी शहर प्रतिनिधी : राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहाता तालुका सल्लागारपदी सर्वानुमते, सेवानिवृत्त मुख्याधिकारी श्री.बाळासाहेब गुळवे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. गुळवे हे राहाता तालुक्यातील गोगलगाव येथील रहिवासी असून ते उच्च शिक्षित तसेच कायदेपंडित आहे तसेच त्यांनी मंत्री श्री. बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नगरपालिका मुख्याधिकारी या शासकीय पदावर प्रदीर्घ काळ सेवा दिलेली आहे.
राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन सेवानिवृत्त प्रामाणिक अधिकारी वर्ग देखील प्रहार पक्षात विराजमान होत आहे. हेच राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे होणाऱ्या जनतेच्या सेवकार्याची पावती आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संजय शिंदे, जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे उपस्थित होते.
प्रहार जनशक्ती पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष श्री दिनेशराजे शेळके, तालुका उपाध्यक्ष श्री विजय काकडे, तालुका संघटक श्री. वसंतराव काळे यांच्या खंबीर नियोजनातून ही नियुक्ती देण्यात आली आहे. यानिमित्त प्रहारचे निमगाव शाखा उपाध्यक्ष सचिन आरने, प्रोफेसर मयूर कुदळे, संजय खंडिझोड, अजय खंडिझोड, विशाल ठोंबरे आदी प्रहार सेवक उपस्थित होते.

