शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शिर्डी शहरात नगरपंचायतच्या वतीने मोठ्या प्रमाणावर ओपन स्पेस ताब्यात घेऊन विकसित करण्यात आले आहे. यापैकी काही ठिकाणी गार्डन, जिम, चिल्ड्रन पार्क विकसित करण्यात आले आहेत.
परंतु उद्घाटनाच्या नियोजनाच्या अभावामुळे पर्यायी वापरा अभावी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत उगवुन दुर्दशा झाली आहे. काही वर्षपूर्वी गार्डन पूर्ण झालेले असतांना देखिल उद्धघटना वाचून नागरिकांसाठी खुले नाही, हि खेदाची बाब आहे. शहरामध्ये मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही उद्यान किंवा बगीचा नाही नगरपंचायतच्या वतीने विकसित केलेले ओपन स्पेस मध्ये मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी बाक ठेवले तर त्यांच्यासाठी ते विरंगुळ्याचे साधन होईल आणि शहराच्या वैभवात सुद्धा भर पडेल.
तरी कृपया आपण सर्व गार्डनचे शुभारंभ करून नागरिकांसाठी उपलब्ध करून दयावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा युवा मोर्चा लहान मुले व जेष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन सेल्फी विथ कचरा गार्डन निषेध मोहीम सोशिअल मीडियाच्या माध्यमातून राबवेल. यावेळी निवेदन देतांना भा.ज.यु.मो शिर्डी शहर अध्यक्ष योगेश आण्णा गोंदकर, संघटन सरचिटणीस लखन बेलदार, सरचिटणीस आकाश अडांगळे, उपाध्यक्ष अमोल बडे, सहसोशल मीडिया प्रमुख विशाल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

