पूनाळ । प्रतिनिधी:- राज्यात सुरु असलेली कोरोनाची महामारी याच्यामुळे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन नरविर शिवा काशिद यांची361 वी.पुण्यतिथी नेबापुर येथील समाधीस जलाभिषेक,व दूग्धभिषेक घालुन शिववंदना व पुजा ,आर्चा करुन काही मोजकेच समाज बांधव व मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला.असे प्रतिपादन नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष सयाजी झुंजार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी सांगितले.
सयाजी झुंजार म्हणाले की,आंम्ही समाज बांवव व शिव प्रेमी यांना आवाहन केले होते की,ज्या त्या गावा मध्ये नरवीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी.या आवाहानाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध भागात सामाजिक उपक्रमातुन साजरी करण्यात आली.पुनाळ,कोतोली,कसबा ठाणे,साळवण,राधानगरी,कोडोली,हातकणंगले,इचलकरंजी,मलकापूर,कोल्हापूरशहर,चंदगड,करवीर,शाहूवाडी,कागल,भुदरगड,केर्ली,शिरोळ,जयसींगपूर,बालींगा,आजरा,गडहिंगलज यासह जिल्ह्यातील आदी भागात पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी झाली.
यावेळी भगवान चित्ते(धुळे),रवींद्र दधडेल,रुपाली धडेल,भिमराव काशिद,रवी काशिद,आनंदा काशिद,सदाशिव सुर्यवंशी,संवर्धन समीतीचे अध्यक्ष संतोष चव्हाण,उपाध्यक्ष विश्वास गंगाधर,संग्राम माटे,संतोष चव्हाण,भिमराव शिंदे,बाळासाहेब साळोखे,नरेंद्र माने,मनोज टिपुगडे,संतोष सावंत,सदाशिव सावंत,गजानन शिंदे,प्रकाश संकपाळ युवा मंच म्हाळुंगे यासह आदी समाज बाःधव उपस्थित होते.

