shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिल्याने मुलीचे अपहरण करून अत्याचार..!!

राहुरी: (तालुका प्रतनिधी-दिपक हरिश्चंद्रे)                                          

19 जून ते 24 जुलै रोजी दरम्यान राहुरी तालुक्यातील चेडगांव येथे ही घटना घडली. मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्याचा रागातून दोन तरूणांनी राहुरी (चेडगाव) येथील 18 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला दीड महिना कोंडून ठेवले. दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केला.  


          


या घटनेबाबत पीडीत 18 वर्षीय मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि.19 जून ते 24 जुलै रोजी दरम्यान या घटनेतील 18 वर्षीय मुलगी ही तिच्या घराजवळील ओढ्याच्या रस्त्याने  आपल्या आईकडे जात असतांना चेडगाव-ब्राह्मणी जाणार्‍या कच्च्या रस्त्यावरून या प्रकरणातील आरोपींनी त्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला अहमदनगर तालुक्यातील केडगाव येथील रूमवर नेले. त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न आरोपीबरोबर लावून दिले नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर दीड महिना त्या मुलीस रूममध्ये डांबून ठेवले. दरम्यान तिच्यावर वेळोवेळी बलात्कार देखिल केला.

दि. 29 जुलै रोजी पीडित मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र शंकर बर्डे रा.गोरेगाव,ता. पारनेर, त्याच्या सोबत असलेला अनिल नावाचा तरूण आणि रवींद्र शंकर बर्डे याची ज्योती नामक चुलत बहीण रा.केडगाव,ता.नगर या तिघांवर अपहरण व शारिरीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रवींद्र शंकर बर्डे याला ताबडतोब अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.


Shirdi Express Live#(राहुरी- तालुका प्रतिनिधी ) बातम्या🗞️ आणि जाहिराती करीता संपर्क @दिपक हरिश्चंद्रे 📲7350591600

close