नगर :(दि .३१) : नगर ता.पंचायत समितीचे मा. सभापती ,अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे मा. चेअरमन, हनुमान विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव ,अहमदनगर जिल्ह्यातील एक आदर्शवत व्यक्तिमत्व मा.बन्सीभाऊ म्हस्के यांचे वयाच्या 87 व्या वर्षी आज सकाळी हृदयविकाराने दुःखद निधन झाले आहे.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन, गोरगरीब जनतेच्या सहकार्याने जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणारे बन्सी भाऊ म्हस्के हे उमदा व्यक्तीमत्व होते.

