shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभाविप कडून पूरग्रस्त विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप..!!


मलकापूर ( प्रतिनिधी): शाहूवाडी तालुक्यात झालेल्या धुवाँधार पावसामूळे परिसरातीत जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांना आलेत्या महापूरामूळे तालुक्यातील काही गावे जलमय झाल्यामूळे घरांचे नुकसानीसह. ऊसशेती, भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामूळे शेतकरी पूर्ण हाताश झालेला दिसत आहे.

करंजफेन, पाल, सावर्डी, कासारी नदी काठावरील गावातून महापूराचे पाण्याने हाहाकार निर्माण केल्यामूळे
दोन वर्ष कोरोना महामारीने जर्जर झालेल्या जनमानसावरती नैसर्गिक संकटामूळे हताश झालेला दिसत आहे. मदतीचा हात देण्यासाठी विविध क्षेत्रातून मदत होत आहे.विद्यार्थाना शालेय साहित्यांची मदत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाहूवाडी तालुक्याच्या वतिने तालुकाप्रमुख प्रसाद लष्कर, प्रथमेश जांभळे, मावळा संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण कारंडे, दैनिक पुढारीचे पत्रकार श्री संजय पवार, तसेच गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ उपस्थित होते
close