shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगाव शहरातील एनए प्लाँटींग मधील खरेदी झालेल्या प्लाँटची सातबारावर नोंद घ्या..!!

(अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३१,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील २० वर्षापुर्वी तत्कालीन तहसिलदार यांच्या मार्फत एन.ए.झालेले प्लाँटींग गट क्रमांक ५५८,९४४,९५१,९५२,९५४,९५५ व ९५७ या गटामधील एन.ए.झालेले प्लाँटींगचे सर्व खरेदी-विक्री आणि हस्तांतरण बंद झाले आहे.त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे आणि शासनाचा महसुल सुध्दा बुडत आहे.त्यामुळे सेनगाव शहरातील एन.ए.प्लाँटींग मधील खरेदी झालेल्या प्लाँटची सातबारावर नोंद घेण्यात यावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या वतीने दि.२९ जुलै रोजी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.


खरेदी झालेल्या प्लाँटचे तत्कालीन ग्रामपंचायत व सध्या अस्तित्वात असलेल्या नगरपंचायत मध्ये रितसर नोंद करुन नमुन नंबर ८ सुध्दा केलेली आहे.परंतु मागील दोन वर्षांपासून या प्लाँटींग मधील खरेदी केलेल्या मुळ सातबाराला नोंद होत नसल्यामुळे सदरील प्लाँटचे खरेदी-विक्री व्यवहार बंद झालेले आहेत आणि या प्लाँटींगमधील खरेदी करुन घेतलेल्या प्लाँटवर बँकेव्दारे गहाणखत सुध्दा केले जात नसल्यामुळे कोंडी निर्माण होत आहे.या खरेदी करुन घेतलेल्या काही गटामधील प्लाँटचे चतुरसिमा नसल्यामुळे मोजमाप सुध्दा केल्या जात नाहीत.त्यामुळे बांधकाम सुध्दा करता येत नाही संबधीत तहसिलदार साहेब यांच्याकडुन असे सांगण्यात येत आहे की,तलाठी सज्जा यांच्याकडे नोंद करुन घ्यावी परंतु तलाठी सज्जा कार्यालयामध्ये मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा करत असुन नागरीक सातबाराला नोंद करण्यासाठी प्रयत्न करीत असतांना सुध्दा मुळ सातबारावर नोंद केली जात नाही.

त्यामुळे या प्लाँट संदर्भात विचारणा केली असता या प्लाँटींगचे क्षेत्रफळ व सातबारा जुळत नसल्यामुळे प्लाँट खेदी केल्याची नोंद घेतल्या जावु शकत नाही असे सांगण्यात येत आहे. अशा प्लाँटींग एन.ए.धारकांचे क्षेत्रफळ मुळ नकाशा सातबारा जुळत नसेल तर यांना मंजुरी कशी मिळाली अशी विचारना केली असता कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले जात नाही.आम्ही मुळ एन.ए.झालेल्या सातबारा नकाशा सहीत दस्ताऐवज तहसिल कार्यालयामध्ये विचारपुस केली असता असे सांगण्यात आले आहे की,या एन.ए.धारकांचे मुळ दस्ताएवज सुध्दा काही गटामधील तहसील कार्यालयामध्ये नसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळ तत्कालीन तहसिलदार साहेब यांनी एन.ए.प्लाँटींगसाठी मुळ सातबारा कोणाची घेण्यात आली होती.

त्यावरील मंजुर नकाशा कोणता करण्यात आला होता.आणि कोणत्या नकाशाप्रमाणे प्लाँट खरेदी-विक्री केल्या गेली आहेत याची सखोल चौकशी करावी कारण चुकीच्या सातबारा देऊन प्लाँटींग एन.ए.केलेली असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.या संपूर्ण परीस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी सेनगाव शहरातील एन.ए.प्लाँटींग मधील खरेदी झालेल्या प्लाँटची सातबारावर नोंद घ्यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष पंडीत तिडके,हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कुटे,युवा जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे,महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई धुळे,किसान विभाग शंकरराव देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष इरफान पठाण,महिला जिल्हा कोषाध्यक्ष आशाताई घोडके,हिंगोली तालुकाध्यक्ष वसंत जोगदंड,सेनगाव तालुकाध्यक्ष संतोष पोले,सेनगाव महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई थिट्टे,मधुकरराव देशमुख आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
close