श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :-महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात रविवार दिनांक ०१/०८/२०२१ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे अध्यक्ष स्थानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख हे होते.
या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद व इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद प्रदेश उपाध्यक्ष बि.के.सौदागर प्रदेश सचिव किशोर गाडे आदी उपस्थित होते बैठकीत पत्रकार संघाचा विस्तार करणे कामी चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीत उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी राजमोहंमद शेख तर श्रीरामपूर शहराध्यक्षपदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रियाज खान यांची निवड करण्यात आली असून संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली सर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
बैठकीचे सूत्रसंचलन राजमोहंमद शेख यांनी केले बैठकीत मार्गदर्शन करताना शेख बरकत अली यांनी पत्रकार संघाच्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विस्तार झालेला असून संबंधित पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या परीने कामकाज करीत आहेत पत्रकार संघाने आज २९ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
पत्रकार संघात सहभागी होणाऱ्या सर्व पत्रकारांना सुरक्षाकवच असल्याचे शेख यांनी सांगितले. पत्रकारावर होणाऱ्या अन्याया विरुद्ध व त्यांच्यावर दाखल होणाऱ्या खोट्या गन्ह्या विरुद्ध पत्रकार संघ प्रत्युत्तर देण्यास समर्थ आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत बेलापूर शहराध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाब भाई शेख, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख, बेलापूर शहर सचिव शफिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीत पत्रकार संघाचे बेलापूर शहर खजिनदार सलीम शेख, बेलापूर शहर उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, बेलापूर शहर संघटक मुसा सय्यद तसेच अमीर बेग मिर्झा सामाजिक कार्यकर्ते राजभोज, गोरे ,अरुण बागूल आदी पत्रकार उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार इलेक्ट्रॉनिक मिडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांनी मानले.

