--------------------------------------
गुंडेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती साजरी..!!
----------------------------------------
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के ):-
नगर तालुक्यातील मौजे गुंडेगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती (दि.१) ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. यावेळी गावचे उपसरपंच संतोष भापकर, जेष्ठ नागरिक वामनराव जाधव गुरुजी व संतोष सकट यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मान्यवरांची जाहीर भाषणे झाले.
सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे श्री वामनराव जाधव गुरुजी होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विलास सकट यांनी केले. तसेच उपसरपंच संतोष भापकर यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची माहिती दिली की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे महापुरुष होते महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी मधून त्यांचे आदर्श विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुण पिढीने महापुरुषांच्या आत्मचरित्राचे वाचन केले पाहिजे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा साहित्यनिर्मिती केली.
छत्रपती शिवाजीमहाराजांचे पोवाडे सातासमुद्रांपलीकडे नेऊन त्यांच्या विचार पेरणीची मोलाचे कार्य त्यांनी केले.असे प्रतिपादन त्यांनी केले..
यावेळी अध्यक्ष भाषणातून वामनराव जाधव यांनी सांगितले आजचा तरुण त्यांच्या विचारापासून भरकटत आहे. त्यामुळे तरुणांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जरूर अभ्यासावे अण्णाभाऊंनी आज सर्व दलित समाजातील लोकांना समाजात कसे जगावे हे शिकवून गेले असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी उपस्थितांमध्ये श्री जावळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, संजय भापकर,पोपट भापकर, साहेबराव सकट, , दादासाहेब आगळे, पत्रकार मेजर संजय भापकर, मेजर शाम कासार,माऊली कुताळ, गणेश हराळ,मेजर कारभारी आगळे,आर.पी.आय.शाखा प्रमुख मोशि जावळे,आदी नागरिक उपस्थित होते यावेळी ह.भ.प. भिवसेन महाराज हराळ यांनी आभार मानले.

