shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजप्रुथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात व मार्गदर्शक नानासाहेब खरात यांनी केला शहा कुटुंबाचा सत्कार..

तेजप्रुथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात व  मार्गदर्शक नानासाहेब खरात यांनी केला शहा कुटुंबाचा सत्कार..

प्रियंका संदेश शहा  यांनी पुणे विद्यापीठात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल केले अभिनंदन.

इंदापूर प्रतिनिधी: (७ ऑगस्ट २०२१) वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे  हे ओळखून मानवाला तसेच  प्राण्यांना  शूदध हवा, पाणी,अन्न  जगण्यासाठी लागते ,वनस्पती जगल्या वाढल्या  तर हे सगळ मूबलक प्रमाणात मिळेल .वनस्पतीशास्त्र या विषयात सूवर्ण पदक पटकावने हे इंदापूर करांच्या अभिमानाची गोष्ट आहे.  प्रियंका संदेश शहा  यांनी खुप मोलाचे काम केले आहे. त्या निमित्त प्रियंकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन जे वडील डॉक्टर संदेश शहा व डॉक्टर राधिका शहा यांचा तेज पृथ्वी ग्रुपच्या वतीने ( दि.७ ) सत्कार करण्यात आला.

यावेळी तेज पृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक खरात म्हणाले की,ज्यांच्याकडे गुंठा ही पिकाऊ जमीन नाही आशा घरातील मुलीने शेतिशी निगडीत विषयात अभ्यास करून  सुवर्णपदक  मिळवणे तसेच शेतकर्यांच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना शेती विषयी मार्गदर्शन करणे ही खुप कौतुकास्पद गोष्ट  असून अशा कन्येला घडवणाऱ्या व  घरातील सर्व डॉक्टर पेशात असताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मुलीची इच्छा आवड  ज्या क्षेत्रात आहे. तिला ते क्षेत्र निवडणून देण्यास व तिला सुवर्णपदक मिळण्यासाठी पालक म्हणून जे लागेल ते सहकार्य करणार्या डॉ .संदेश शहा व डॉ राधीका शहा या सुवर्णपदक विजेत्या प्रियंका संदेश शहा हिच्या माता पित्याचां  सत्कार तेजप्रुथ्वी ग्रुपच्या वतिने आम्हास करावयास मिळाला हे आमचे भाग्य  अशा शब्दात खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
close