shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अब्दुल मजिद शॉपिंग सेंटरचे उदघाटन

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अब्दुल मजिद शॉपिंग सेंटरचे उदघाटन
  इंदापूर प्रतिनिधी-(७ ऑगस्ट २०२१)राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील टेंभुर्णी नाका परिसरात बेपारी कुटुंबाने उभारलेल्या अब्दुल मजिद शॉपिंग सेंटरचे( दि.६)ऑगस्ट रोजी उदघाटन करून त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
   सादिक बेपारी, शाबीर बेपारी, इसाक बेपारी यांनी टेंभुर्णी नाका परिसरात अब्दुल मजिद शॉपिंग सेंटर उभा करून व्यवसायाच्या नवनवीन संधी निर्माण केल्या आहेत. 
  उद्योग व्यवसायाची नवनवीन क्षेत्र निर्माण करण्यासाठी बेपारी कुटुंबाने पुढाकार घेतला असून त्यांना या क्षेत्रात चांगले यश संपादनासाठी शुभेच्छा. छोटे व्यवसायास आर्थिक अर्थार्जनासाठी मोठे योगदान देत असतात असे प्रतिपादन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
   यावेळी शकील सय्यद, नगरसेवक कैलास कदम, बापू जामदार, पांडुरंग शिंदे, अख्तर कुरेशी, जाकिर बेपारी, जावेद बागवान, रियाज शेख, इसुफ बागवान, अविनाश कोथमिरे, अफसर मोमीन, सलीम कुरेशी उपस्थित होते.
close