shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डुकरावर कुत्र्यांचा हल्ला हल्ल्यात एरंडोल येथील स्थानिक नागरिक - विजय जोशी गंभीर जखमी...!!


प्रमोद चौधरी
एरंडोल
एरंडोलला धरणगांव रस्त्यावर बेवारस कुत्रे - डुकरे झाली उदंड डुकरावर कुत्र्यांचा हल्ला - विजय जोशी गंभीर जखमी - मेंदूला दुखापत -मदतीचे आवाहन एरंडोल  - शहराबाहेरील धरणगांव रस्ता आणि म्हसावद रस्त्यावरील बेवारस कुत्रे आणि डुकरे उदंड झाली असून दररोज एक - दोन डुकरांचा कुत्रे फडशा पाडत असून लहान मुले आणि महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . सरस्वती कॉलनी आणि इतरांनी देखील नपा मुख्याधिकारींकडे लेखी तक्रार केली होती . परंतू कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त अद्याप झाला नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . झाले असे की , धरणगांव रस्त्यालगत साईगजानन कॉलनीतील रहिवासी विजय जोशी ( महाराज ) हे आपल्या स्कूटी वाहनाने मंगल टाईल्सकडून दि . २१ रोजी धरणगांव रस्त्याने जात असतांना अचानक लक्ष्मीनगरकडून दुपारी डुकराच्या मागे धावत २/३ कुत्रे आले आणि गाडीवर आदळले . त्यामुळे विजय जोशी जोरात रोडवर फेकले गेल्याने डोक्यावर पडले , मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बेशुध्द झाले . परीसरातील नागरीक आणि रिक्षाचालकांनी त्वरीत खाजगी दवाखान्यात हलविले परंतू गंभीर दुखापतीमुळे त्वरीत जळगांवी खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . जळगांव येथील न्युक्लीअस हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल आहेत . जोशी महाराज घरगुती जेवणाचे डबे पुरवून आपला उदरनिर्वाह चालवितात . त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना दवाखाना खर्च जास्त अपेक्षित आहे . २/३ ऑपरेशन्स करावी लागणार असून एरंडोल शहरासह परिसरातून , जिल्ह्यातून दानशूरांनी मदतीचा हातभार लावल्यास जोशी महाराजांवरील जेवघेणे संकट टळू शकणार आहे . यासाठी अल्केश जोशी मो . ७०५८५८५३० ९ यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे . एरंडोल नपाने आतातरी दखल घेवून बेवारस कुत्र्यांचा आणि डुकरांचा बंदोबस्त करावा अशी नागरीकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे .
close