करमाळा : शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी
करमाळा : ( दि.20 ) : करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील रहिवासी जेष्ठ नागरिक माणिक बलभिम वायकर ( वय 84 ) यांचे 19 ऑगस्ट रोजी रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,तीन भाऊ भावजय सुना नातवंडे असा परिवार आहे.
करमाळा येथील हिंदु स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
एक मनमिळावु व्यक्तीमत्व हरपल्याने करमाळा शहरवासीयांनी हळहळ व्यक्त केली आहे .

