shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हा खेळ कुणाला दैवाचा कळला...!!



डॉ.राज किशोर पारीख यांचा अपघाती मृत्यु..!! 

प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधी:-

वसंत कनिष्ठ महाविद्यालय केज येथील प्रा. पारिख नंदकिशोर यांचा मुलगा राजकिशोर हा नुकताच एम.बी.बी.एस चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून लातूर येथे कार्यरत होता. दिनांक 19/ 8/2021रोजी संध्याकाळी अंबाजोगाई लातूर रोड वर लातूर शहराजवळ राज किशोर यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. डॉ. राज किशोर यांच्या डोक्याला जबर मार लागला व त्यातच त्यांचा अंत झाला.


प्राध्यापक नंदकिशोर पारीख यांचा मुलगा बालपणापासूनच अत्यंत  तीक्ष्ण बुद्धीचा होता.  प्रा पारीख यांनी त्याला वैद्यकीय शिक्षणासाठी  पाठवण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच गतवर्षी झालेल्या एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत राज किशोर याने अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन परिवारासह परिसरातील जनतेची मान उंचावली होती. प्रा.पारीख यांच्या परिवारासाठी येणारा काळ अत्यंत सुखाचा दिसत होता... परंतु नियतीच्या निर्दयी खेळापुढे कोणाचे काही चालत नाही.होतकरू,हुशार बुद्धिमान  मुलाचा दुःखद अंत पाहून परिवाराला किती यातना होत असतील याची आपण कल्पना करू शकतो. केवळ पारिख परिवारा वरच नाही परिसरातील जनतेवर दुःखाचा डोंगर पसरला आहे अंत्यविधीसाठी आलेल्या आबालवृद्धांसह परिसरातील लोकांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. आडवळणी भावठाणा गांव परंतु आज माणसांच्या गर्दीत भावमय झाले होते.एम.आय.टी.मेडीकलचे सर्व विद्यार्थी विद्यार्थींनी आपल्या मिञाला शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते.

    
अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.रमेशराव आडसकर, ऋषिकेश आडसकर यांनी पारीख परिवाराचे  सांत्वन करुन प्रत्यक्ष  उपस्थिती लावली
 
या प्रसंगी प्रा.गणेश चाळक, परळीचे गट शिक्षण अधिकारी केंद्रे यांनी राज किशोर याच्याबद्दल व पिता पारेख नंदकिशोर  यांच्या बद्दल भावना व्यक्त केल्या व आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
 
या दुःखद प्रसंगी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेतील प्राचार्य डॉ.माधवराव फावडे, प्राचार्य नखाते ,प्राचार्य मोरे , शंकर विद्यालय साळेगांवचे मुख्याध्यापक प्रविण देशमुख ,वसंत शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन  प्रा.शाहु साखरे  व सर्व कर्मचारी उपस्थित  होते.
close