इंदापूर तालुक्याला पडलेले सुवर्ण स्वप्न म्हणजेच हर्षवर्धन पाटीलसाहेब. मधुकर मोहिते.
इंदापूर प्रतिनिधी: (२० ऑगस्ट २०२१) भाजप नेते व माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त शिर्डी एक्सप्रेस यास मधुकर मोहिते यांनी अतिशय मार्मिक भाषेत दिलेली प्रतिक्रिया अशी आहे की,
विद्यार्थीदशेपासूनच राजकारण हे समाजकारण मानून तमाम महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजविणारे नाव तसेच इंदापूर तालुक्याला पडलेले सुवर्ण स्वप्न म्हणजेच हर्षवर्धन पाटील साहेब होय.सर्वसामान्य जनता हेच स्वतःचे कुटुंब मानून पाटील साहेबांनी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कसे करावे याचे उत्तम उदाहरण तमाम महाराष्ट्राला घालून दिले.
१९९५ पासून ते २०१४ पर्यंत तमाम महाराष्ट्राची मंत्रिपदाच्या माध्यमातून खरी सेवा करण्याची संधी मिळालेले दमदार नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटील साहेब होय.त्यांना ज्या खात्याचे मंत्रीपद मिळाले त्या खात्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपास आणले. प्रचंड मेहनत, सखोल अभ्यास, कामाप्रती निष्ठा आणि जनतेची सेवा करण्याचा ध्यास या सर्व गुणांमुळेच हर्षवर्धन पाटीलसाहेब सर्वापेक्षा वेगळे ठरले.
अगदी वाड्या-वस्त्या पासून ते गाव शहरापर्यंत सर्व लहान पोरांच्या पाटीलसाहेब हे परिचय याचे आहेत यांची प्रचिती साहेबांचे भाषण चालू असताना साहेबांनी शेवटी बसलेल्या व्यक्तीचे नाव घेतले की येते. आणि सर्व उपस्थित जनसमुदाय समजून जातो की, जनतेशी नाळ जोडलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब हे आघाडीचे नाव आहे .
माझ्या जिवनात घडलेला एक प्रसंग येथे आवर्जून घ्यावा असे वाटते ,एकदा कोल्हापूरला दर्शनाला गेलो असता वडापावच्या गाड्या पासून चालत जात असताना त्या ठिकाणी चार पाच लोकांची जी चर्चा ऐकली ते आठवून आजही अभिमानाने ऊर भरून येतो. आणि साहेबांच्या छत्रछायेत आयुष्य व्यतीत करतो याचा सार्थ अभिमान वाटतो आणि यासाठी परमेश्वराचे आभारही मानतो.
त्या चार व्यक्तीच सर्वसामान्य होत्या. पण पाटीलसाहेब सत्तेत नसताना त्यांचे गुण, कार्य ,नेतृत्व, कर्तुत्व याबद्दल बोलताना त्या थ कतच नव्हत्या .न राहून मी ही त्या अनोळखी गटात सहभागी झालो . त्यांच्या मतदारसंघातला आहे म्हटल्यावर कोल्हापूरमधील त्या व्यक्ती म्हणाल्या की, "आपले एकच कुटुंब आहे ". मी धन्य झालो केवढे मोठे त्यांचे कुटुंब!
कधीही जात पात, उच-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदभाव न मानता, सर्वसामान्यांमध्ये मिसळून सर्वसामान्यांचे तयार झालेले असामान्य नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटीलसाहेब होय. इंदापूर तालुक्यातीलच नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेतृत्व म्हणजेच हर्षवर्धन पाटीलसाहेब होय.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील कर्तबगार नेता म्हणून नावलौकिक असलेले हर्षवर्धन पाटीलसाहेब
१९९५ ते २०१४ या कालावधीमध्ये हर्षवर्धन पाटीलसाहेब यांनी वेगवेगळ्या खात्याचे मंत्रिपद भूषविले. या कार्यकाळातील खास बाब म्हणजे त्यांनी ज्या खात्याचे मंत्री पद भूषवीले ते खाते विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून अभ्यासकांच्या व राजनीति तज्ञांच्या अभ्यासाचा विषय बनून राहिले. संसदीय कार्य मंत्री असताना त्यांनी साहेबांनी ज्या पद्धतीने विधान भवनाचे कार्य सांभाळले ते वाखाणण्याजोगे व "न भूतो न भविष्यती" असेच होते. पाटीलसाहेब यांचा संयमी, शांत, मनमिळाऊ स्वभाव पाहून विरोधकही मित्र बनून गेले. विधान भवनात शिवसेना आमदार महोदयांनी एक वेळेस आत्मदहनाचा प्रयत्न केला व अंगावर पेट्रोल ओतून घेतले. पण पाटीलसाहेबंनी प्रसंगावधान राखून आमदार महोदयांना मिठी मारली आणि लायटर हिसकावला. त्या वेळी त्यांची कृती ही देव दुतापेक्षा कमी नव्हती. त्यामुळेच महाराष्ट्राचे विधान भवन वाचले आणि महाराष्ट्राची शान ही राखली गेली.
"उगवत्या सूर्याला मावळणे ही आहेच .शिवाय मावळल्या नंतर पुन्हा लख प्रकाशाच्या सोनेरी किरनासह उगवणे ही आहेच ".
आई जगदंबेच्या ,ग्रामदैवत भैरवनाथाच्या, इंद्रेश्वराच्या कृपेने. त्यांचे नेतृत्व पुन्हा एकदा गरुड भरारी घेईल. त्यांचा तोच रुबाब, पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राने याची देही याची डोळा पहावा. अशी ईश्वराकडे प्रार्थना करून हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्याकरिता उदंड आयुष्याचे आणि जनसेवेचे मागणे मागतो.
श्री.मधुकर मोहिते
नीरा-भीमा परिवार
मु. टनु .ता. इंदापूर, जि. पुणे.
+91 79723 96472

