प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी:-
उपजिल्हा अधिकारी शरद झाडके यांनी शनिवारी केज शहरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली व शहरातील नाल्या काढण्याचे व प्रत्येक गल्लीत फवारणी करून घेण्यास सांगितले . यावेळी नायब तहसिलदार सचिन देशपांडे उपस्थित होते .
केज शहरातील स्वच्छता ची शरद झाडके यांनी अचानक पाहणी केली व नगर पंचायत कर्मचाऱ्यांना तातडीने स्वच्छता करून घेण्यास सांगितले तसेच शहरात फवारणी करून घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे .
सध्या डासाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात म्हणून नाल्यावर औषध फवारणी चालू करण्यात आली असून डेंग्युच्या डासाची निर्मिती होऊ नये म्हणून संपूर्ण शहरात फवारणी करायला सांगण्यात आले आहे. यामधे टॉप बारुद , सिल्कोड्राल , डेलफॉग , ब्लिचिंग आदी फवारणी करून धुरळणी पण करण्यात यावी अश्या नगरपंचायत ला सुचना देण्यात आल्या आहेत .
ना. त. सचिन देशपांडे यांनी तातडीने शहरात फवारणी मोहिम हाती घेतली असून फवारणी झाल्या नंतर लागालिच धुरळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले व नागरिकांनी पण स्वच्छतेची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

