shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अमोलराजे मित्रपरिवार यांच्यावतीने श्रावण बाळ आश्रम इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा

अमोलराजे मित्रपरिवार यांच्यावतीने श्रावण बाळ आश्रम इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील श्रीराम मंदिर या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांच्या ५८ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त अमोलराजे इंगळे मित्र परिवार यांच्या वतीने श्रावण बाळ आश्रम शाळेत इडली बनवण्याचे साहित्य , खाऊ फळे इत्यादी देऊन श्रावण बाळ आश्रमतील मुलांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला .
यावेळी अमोलराजे इंगळे, अजित गायकवाड, यशराज औताडे , किरण यादव, सुरज वीर, कैलास  सटाले,    गणेश फलफले, मंगेश गोपलकर, विशाल मेंगडे,  विशाल खराडे महाराज इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की, महाराष्ट्रातील लोकप्रिय, सहकाराचे जाणकार, इंदापूर तालुक्याचे विकासरत्न, सर्वसामान्य बहुजनांचे नेते,  भाजप नेते आणि माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सामाजिक राजकीय ,सांस्कृतिक क्षेत्रात भरभरून उन्नती व्हावी. त्यांचे जीवनमान उंचवावे . तसेच अनाथाश्रमातील मुलांना खाऊ वाटप, फळे वाटप, तसेच त्यांना उपयोगी असणारे साहित्य देऊन केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करावयास मिळाले हे आमचे भाग्य समजतो व त्यांना अभिष्ट चिंतनाच्या  माझ्या व मित्र परिवाराच्या  वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.

अमोलराजे इंगळे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने नेहमीच विविध माध्यमातून समाज उपयोगी कार्य घडत असते असेच कार्य आज हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त कोरोना चे नियम पाळून अतिशय आनंदात कार्यक्रम संपन्न झाला.
close