shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - राज्यमंञी दत्तात्रय भरणे.

सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - राज्यमंञी दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी: दि २८ सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती बाबतच्या त्रुटी लवकर दूर करून १ जाने २००४ नंतरच्या सर्व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा.या करिता महाराष्ट्र राज्याचे  राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हाचे संपर्क मंत्री  ना दत्तात्रय  भरणे यांचे निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेवून निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.

राज्यमंत्री महोदयांनी यावेळी सातव्या वेतन आयोगातील वेतन निश्चिती त्रुटी बाबत सर्व माहिती असून सरकारच्या माध्यमातून लवकरच दिलासादायक निर्णय घेवू असे सांगितले.
 प्रसंगी इंदापूर तालुका सातवा वेतन आयोग त्रुटी संघटनेच्या वतीने डाॕ उषा भोईटे , नितिन वाघमोडे , संतोष वाघ , गणेश सोलनकर , भारत ननवरे , भुषण जौंजाळ , बापूराव जाधव , शिवाजी जाधव ,नंदकुमार पवार, प्रताप शिरसट , संतोष हेगडे उपस्थित होते.
close