इंदापूर तालुक्यात शिवसेनेचा वाढता प्रभाव.. पळसदेव येथील २१ तरुणांनी बांधले शिवबंधन..
उत्कृष्ट कार्यभार साभाळणारेअधिकारी महेश पवार तसेच इतर संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: (१२ ऑगस्ट २०२१)पळसदेव येथील नुकतेच शिवसेनेच्या शिव सहकार सेनेच्या तालुका प्रमुख पदी सुरज काळे यांची निवड झाल्यानंतर पळसदेव येथील २१ तरुणांनी आज( दि. १२) रोजी पुणे जिल्हा समन्वयक विशाल दादा बोंद्रे, इंदापूर तालुका शिवसेना प्रमुख नितीन शिंदे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शिवसेना प्रणित माथाडी जनरल कामगार व ट्रान्सपोर्ट संयुक्त सरचिटणीस महाराष्ट्र राज्य चे दुर्वास शेवाळे, आप्पासाहेब डोंगरे तालुका उपप्रमुख शिवसेना या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते शिवबंधन बांधून तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये युवराज नगरे, सुर्यकांत चव्हाण, प्रवीण गायकवाड, आकाश नगरे, सचिन चमरे, बाळा नगरे ,आकाश पवार, सचिन काळे, सुनील काळे प्रतिक जाधव, विजय चमरे ,अमर काळे, अमोल मोरे ,शरद जाधव ,अक्षय काळे, कपिल चव्हाण, रोहित बांडे, रवी केवटे, विनोद माने, ईश्वर काळे, अक्षय चमरे इत्यादी युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करून सामील झाले.
याप्रसंगी लोणी देवकर येथील कार्यरत असलेले महावितरणचे जूनियर इंजीनियर महेश पवार यांची अकलूज येथे बदली झाली. पवार यांनी या ठिकाणी कार्यरत असताना अतिशय उत्कृष्ट असे कार्यभार सांभाळला त्यांच्या या कार्याची उतराई म्हणून त्यांचा सत्कार शिवसेनेच्या वतीने पळसदेव येथे करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी विजय पवार क्षेत्रीय मराठा संघटक महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब गांधले उपाध्यक्ष पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय तसेच गजानन यादव यांची इंदापूर तालुका अध्यक्ष वारकरी संप्रदाय पदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी हेमंत भोसले राजू शेवाळे बालाजी पाटील संजय खंडागळे प्रमोद डोंगरे प्रतीक काळे तसेच इतर शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते.
पळसदेव येथे शिवसेनेचा वाढता प्रभाव पाहता पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातही अनेक शिवसैनिक शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे विशाल बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले की, नवनियुक्त शिवसैनिक यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक तरुणांना शिव बंधनात बांधून शिवसेना पक्ष वाढवावा. शिवसेना पक्ष हा सर्वांना सामावून घेऊन मानसन्मान देऊन सर्वांचा विकास घडवणारा पक्ष आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यात शिवसेना अधिक प्रभावी ठरू लागली की शेतकऱ्यांच्या कामगारांच्या तसेच गोरगरीब जनते च्या प्रश्नासाठी शिवसेना नेहमी खंबीर पाठीशी उभी राहत असल्याचे आपण नेहमी पाहत आहे आणि येथून पुढेही अधिक प्रभावाने शिवसेना सर्व क्षेत्रात कार्यरत राहील.
यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांचे शिवसेना शिव सहकार तालुकाप्रमुख सुरज काळे यांनी स्वागत करून आभार मानले.

