प्रतिनिधी : संजय वायकर
शिंगवे नाईक : (दि .१२) : पारनेर नगर मतदार संघाचे लाडके आमदार माननीय श्री.निलेश ज्ञानदेव लंके साहेब यांच्या आदेशाने शिंगवे नाईक तालुका नगर येथे निलेश लंके प्रतिष्ठान शाखा शिंगवे नाईक यांच्या विशेष प्रयत्नाने व शासन दरबारी वेळोवेळी पाठ पुराव्यातून मागील कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या "शासन आपल्या दारी" शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे लाभार्थींना पत्रवाटप करता आले नाही . मात्र दि.११ ऑगस्ट रोजी लाभार्थीना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
यामध्ये श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी 50, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी 45, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना एकूण लाभार्थी 15, याप्रमाणे एकूण 110 लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठान शिंगवे शाखेचे अध्यक्ष जावेद सय्यद, उपाध्यक्ष अमोल चौधरी, सचिव अमोल डोळस, खजिनदार हरीश शेळके, कार्याध्यक्ष महेंद्र कोळपकर, सल्लागार आयाज सय्यद, आमदारांचे विश्वासू सहकारी हरिदासजी जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर तालुका अध्यक्ष रविराज जाधव, संदीप पुंड,अनिकेत डोळस, गणेश जाधव, ज्ञानेश्वर डोळस, फारूक सय्यद, प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरासाठी प्रशासनाच्या वतीने कामगार तलाठी बेल्हेकर आणि ग्रामसेवक मंगेशकुमार पुंड, लिपिक सागर डोळस यांचे विशेष योगदान लाभले.

