एरंडोल_/जिल्हा प्रतिनिधी
*बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन-**
*असे प्रकार थांब नार तरी कधी*
* सापडलेल्या गौवंश ची पशुवैद्यकीय डॉ यांचे कडून तपासणी करण्याची मागणी- बजरंग दल*
एरंडोल - येथे पहाटे चार वाजेच्या सुमारास 2 पिकअप वाहन धरणगाव कडून नेरी कडे जात होते या वाहनांवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आला म्हणून त्यांनी या वाहनाचा पाठलाग करून त्या पिकअप मालवाहू वाहनांना मरीमाता मंदिराच्या परिसरात थांबवून ड्रायव्हर यास चौकशी केली असता ड्रायव्हरने उडवाउडवीचे उत्तर दिले म्हणून वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये एका मालवाहू गाडीत चार गौवंश तर दुसऱ्या गाडीत तीन गौवंश यांना दोराच्या सहाय्याने निर्दयपणे बांधण्यात आले होते.
पहाटे सकाळी सहा वाजेच्या सुमारास टाटा मॅजिक कंपनीचे 2 मालवाहतूक वाहनांन मध्ये प्रत्येकी 2 असे चार गौ वंश म्हसावद नाका परिसरातील अंजनी नदीच्या पुलावर पकडण्यात आले.असे 6 लाख रुपये किमतीचे 4 मालवाहतूक वाहन 1लाख रुपये किमतीचे 11 गौवंश जप्त करण्यात आले आहे.
बजरंग दल शाखा एरंडोल चे कार्यकर्ते प्रकाश बद्रीनाथ पाटील आपला मित्र सागर प्रकाश मराठे हे दोघे धरणगाव रस्त्याकडे फिरण्यासाठी जात असताना त्यांना माहिती मिळाली की या रस्त्याने गुरांची वाहतूक होते म्हणून हे वाहने पकडण्यासाठी त्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते मुकेश भोई, शंतनू भेलसेकर, कुणाल ठाकूर विवेक ठाकूर यांना बोलावून घेतले व पहाटे चार वाजेच्या सुमारास एम एच 41 ए यु 0805 व एम एच 15 डी के 1212 हे बोलेरो पिकप मालवाहू वाहनांमध्ये 7 बैलांना दोराच्या साह्याने बांधून कत्तलीसाठी नेण्यात या उद्देशाने कोणतीही काळजी न घेता दाटीवाटीने कोंबून भरलेल्या स्थितीत आढळून आले. हे दोघे वाहने पोलीस स्थानकात जमा करीत असताना त्याच्या मागोमाग सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन टाटा मॅजिक मालवाहतूक वाहने जाताना दिसली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्या वाहनांचा पाठलाग करून त्या दोघी वाहनांना म्हसावद नाक्या वरील अंजनी नदीच्या पुलावर एम एच 20 इ जी 6396 व एम एच 20 इ जी 4097 या दोन वाहनांमध्ये चार बैल बांधण्यात आले होते.
या चार वाहनांमधील ड्रायव्हर यांची नावे तुषार प्रभुलाल गोपाल रा हाडाकेड ता शिरपूर जिल्हा धुळे, राहुल संतोष गोसावी रा अहिल्यापुर तालुका शिरपूर जिल्हा धुळे, वसीम बाबु पटेल रा. कंडारी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव, शाहरुख रहीम पटेल रा कंडारी तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या आरोपींना महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 च्या 5 अ,9, व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 च्या 11 (1) (d) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली संदीप पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
*चौकट*
चोपडा शिरपूर धरणगाव या मार्गाने दररोज रात्रीच्या सुमारास गुरांची वाहतूक करणारे अनेक वाहने हे नेरी मार्गे औरंगाबाद कडे जात असतात या मार्गावर जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे रात्रीची गस्त वाढवून जास्तीत जास्त वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हिंदूवादी संघटना व गौरक्षा प्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच चोरी करून आणलेली गुरे हे याच मार्गाने जातात त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
बजरंग दल शाखेच्या कार्यकर्त्यांमार्फत पोलीस निरीक्षक यांना अर्ज देण्यात आला या अर्जात म्हटले आहे की जप्त करण्यात आलेल्या अकरा बैलांना पशुवैद्यकीय डॉ यांचे कडून तपासणी करून घ्यावी, या बैलांना खोलवर जखमा झालेल्या आहेत व त्या गंभीर स्वरूपाच्या आहेत व याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी जरुरीचे असल्यामुळे पशुवैद्यकीय यांचा अहवाल देण्यात यावा असे म्हटले आहे.

