shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ जंगली झाडाचं वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन..!!



वृक्षारोपण ही काळाची गरज - तुषार महाजन

शिर्डी | दि. २२ प्रतिनिधी :

शिर्डी येथील आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, तुषार महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपेवस्ती येथे १०१ जंगली झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रीन फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अमित जगताप म्हणाले की, पत्रकार तुषार महाजन आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या आदर्श निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कार्यरत आहे. आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करून सर्वसामान्य वाचकांपासून तर सुशिक्षित वाचकांना वृत्तपत्र उपलब्ध करून रात्रदिवस आहोरात्र जनजागृती करत आहे. बलशाली भारत घडविण्यासाठी आपण आणखीन जोमाने काम करावे. यावेळी वनविभाग लोणी काळभोर, ग्रीन फाऊंडेशन, पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी, महाराष्ट्र राज्य लोणी काळभोर ग्रामस्थ, विभा गिरिश ट्रस्ट, जनाई शिक्षण संस्था, कुस्ती प्रेमी दिलीप शेवाळे उपस्थित होते.

वृक्षारोपण ही काळाची गरज आहे समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षाची लागवड ही आपल्या लेकरा प्रमाणे करावी. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील.
- पत्रकार तुषार महाजन
     ७६६६६७५३७०
close