shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज रोटरीचे 2021 आदर्श शिक्षक(नेशन बिल्डर) पुरस्कार जाहीर..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:- 
 रोटरी क्लब ऑफ केज यांच्या वतीने 2021 या वर्षीचे आदर्श शिक्षक अर्थात Nation Builder) पुरस्कार जाहीर झाले असून केज तालुक्यातील एकूण 11 शिक्षक-शिक्षकांना यावर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे वितरण 17 सप्टेंबर 2021 मराठवाडा मुक्तीदिनी सायंकाळी 4 वाजता श्रीराम मंगल कार्यालय (बीड रोड केज) येथे करण्यात येणार आहे.



शिक्षक हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक शिक्षक शिक्षिका अत्यंत प्रामाणिकपणे व आपल्या शिक्षकी पेशात निष्ठा ठेवून अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य करतात. चांगले विद्यार्थी घडवून ते अप्रत्यक्षपणे राष्ट्रनिर्मितीचे महान कार्य करतात. 




आपल्या सेवेत ते विद्यार्थी घडवताना सामाजिक कार्यही करतात. अशा शिक्षक-शिक्षिकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी केज रोटरी दरवर्षी "Nation Builder"  अर्थात आदर्श राष्ट्रनिर्माता शिक्षक हा पुरस्कार देऊन गौरव करते. यावर्षी तालुक्यातील एकूण अकरा शिक्षक-शिक्षिकांना हे पुरस्कार जाहीर केले असून यामध्ये
1. श्रीमती श्रीमंगले सावित्रा भाऊराव (जि.प.प्रा. शाळा केळगाव ता. केज)
2. श्रीमती केजकर दिपाली रामचंद्र (जि.प.प्रा. शाळा युसुफवडगांव ता. केज)
3. श्रीमती शिंदे नयना बाबुराव
(जि.प.प्रा. शाळा सांगवी ता. केज)
4. श्रीमती चौधरी सुरेखा मंचकराव
(जि.प.मा. शाळा मस्साजोग ता. केज)
5. श्रीमती फुलसुरे महादेवी विश्वनाथ
(जि.प.प्रा. शाळा काशीदवाडी ता. केज)
6.श्री शिंदे प्रमोद साहेबराव
(जि.प.मा. शाळा भाटुंबा ता. केज)
7. श्री तरकसबंद वसंत उद्धवराव
(जि.प.प्रा. शाळा ढाकेफळ ता. केज)
8.श्री जाधव शिवशंकर बब्रुवान
(जि.प.मा. शाळा येवता ता. केज)
9.श्री चाटे बालासाहेब गिना
(जि.प.प्रा. शाळा पिसेगाव ता. केज)
10. श्री तारळकर शंकर हरिभाऊ
(जि.प.प्रा. शाळा बोरगाव ता. केज)
11. श्री डोईफोडे विक्रम एकनाथ
(जि.प.प्रा. शाळा मिसाळवस्ती- कोल्हेवाडी ता. केज)  या शिक्षक-शिक्षिकांचा समावेश आहे. केज रोटरीच्या निवडसमितीने अत्यंत काटेकोरपणे मूल्यमापन करून ही निवड केली आहे. या सर्व शिक्षक-शिक्षिकांना येत्या 17 सप्टेंबर या मराठवाडा दिनाचे औचित्य साधून केजचे तहसीलदार मा दुल्हाजी मेंढके, केज उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक मा डॉ संजय राऊत व केजचे पोलीस निरीक्षक मा शंकर वाघमोडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार  आहे. हा कार्यक्रम श्रीराम मंगल कार्यालय (बीड रोड) केज येथे सायंकाळी 4 वाजता पार पडणार असल्याची माहिती अध्यक्ष रो बापूराव सिंगण व सचिव अरुण अंजान यांनी दिली आहे. 

 
केज रोटरीने नेमलेल्या रो विकास मिरगणे यांच्या अध्यक्षतेखालील  निवडसमितीमध्ये संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, माजी अध्यक्ष प्रवीण देशपांडे व रो श्रीराम शेटे यांचा समावेश होता.
close