प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई : सोनई जिल्हा परिषद आरोग्य केंद्र मध्ये covid-19 च्या लसीकरणासाठी सातत्याने होणारी गर्दी पाहता आणि परिसरांमध्ये विद्युत केंद्राचा विजेचा लपंडाव बघता जिल्हा परिषदेचे अर्थ,बांधकाम व पशु संवर्धन सभापती माननीय श्री.सुनीलभाऊ गडाख यांना ग्रामपंचायत आणि सोनई येथील ग्रामस्थांनी वारंवार या तक्रारी केल्यानंतर होणाऱ्या ग्रामस्थांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी सुनीलभाऊ यांनी स्वतःहून 1400 VA व 180 watt 2 बॅटरी इन्वर्टर सोनई आरोग्य केंद्रासाठी त्याचे वितरण आज सकाळी सुनीलभाऊ गडाख यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. राजेंद्र कसबे यांच्याकडे दिले.
या प्रसंगी सोनई पंचायत समितीचे सदस्य श्री.कारभारी काका डफाळ,सोनई ग्रामपंचायत चे विद्यमान सरपंच माननीय श्री. धनंजय वाघ त्यांच्या बरोबर सोनई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री राजेंद्र बोरुडे ,विद्यमान सदस्य श्री.सखाराम राशिनकर, विद्यमान सदस्य श्री. बापूसाहेब ओहळ, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल तागड ग्रामपंचायत सदस्य श्री. नवनाथ दरंदले सोनई सोसायटीचे माजी चेअरमन श्री.आप्पासाहेब निमसे श्री. एलवडे उपस्थित होते.

