shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य विभागाची शनिवार आणि रविवार रोजी 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा तूर्तास रद्द ; आरोग्य विभागाच्या सावळा गोंधळ, विद्यार्थांना नाहक मनस्ताप..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधि दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक-२४ सप्टेंबर २०२१.

मुंबई: शनिवार आणि रविवार रोजी घेण्यात येणारी आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे  आरोग्य विभागाच्या या सावळा गोंधळ कारभारामुळे, अनेक विद्यार्थांना नाहक मनस्ताप झाला आणि बरेच विद्यार्थी हे परीक्षेच्या ठिकाणी गेले तर काही विद्यार्थी हे प्रवासात आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा हि तूर्तास तरी रद्दच आहे अशी माहिती त्यांनी दिली.
      कुणाच्या वडिलांचे नाव चुकीचे तर कुणाला थेट उत्तर प्रदेशमध्ये परीक्षा केंद्र मिळाल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षेत  उघड झाला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अखेर राज्य सरकारने ही परीक्षा तुर्तास रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.    
     विद्यार्थ्यांना इतरही अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.
यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.
उमेदवारांच्या अडचणी
- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही
- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही
- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही
- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य
- संकेतस्थळ अनेकदा हँग होते
आरोग्य विभागातील पदे
१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक
२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदी
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :
संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज
गट क : २७२५ : ४,०५,०००

Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे( प्रतिनिधी)📲7350591600.


close