------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यात रात्री झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीनसह अनेक पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याची माहिती मिळताच आ नमिताताई मुंदडा व तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पहाणी केली तसेच पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यात दि.२३ सप्टेंबर गुरुवार रोजी रात्री अतिवृष्टी झाली. त्यात तालुक्यातील अनेक नद्यानाल्यांना पूर आले आहेत. तालुक्यातील साठवण तलावही ओसंडून वाहत असून त्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. त्या संबंधी माहिती मिळताच केज मतदार संघाच्या आ. नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षयभैया मुंदडा, डॉ वासुदेव नेहरकर, तहसीलदार दुलाजी मेंडके, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने व भाजपाचे तालुका अधक्ष भगवान केदार व सरपंच संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतावर जाऊन नुकसान ग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली आणि सरकारने यासबंधी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील पिकांची अतिवृष्टी मुळे झालेली सद्य परिस्थिती पाहता राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट प्रती हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपनीने देखील शेतकऱ्यांना १०० टक्के विमा रक्कम देण्यात यावा सरकारने तसे आदेश काढावे. _____ सौ. नमिता अक्षय मुंदडा आमदार केज.

