नगर तालुक्यातील अकोळनेर येथे चोरीप्रकरणी गुरुवार दिनांक 23/ 9 /2021 रोजी दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी एकावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दिनांक 16 /9/ 2021 रोजी दुपारी बारा वाजून 45 मिनिटांनी एकाने आपल्या राहत्या घरी आपल्या आर्थिक फायद्यासाठी महावितरण कंपनीची वीज चोरी करत असल्याचे आढळून आले असून त्याने एकूण विद्युतभार सतराशे पन्नास युनिट इतकी वीज चोरी केली आहे त्याची रक्कम 11140 रुपये व कलम 152 प्रमाणे तडजोडीची रक्कम 4000 अशी एकूण पंधरा हजार एकशे चाळीस रुपयाची वीज चोरी केली आहे अशी फिर्याद सारोळा कासार महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता संदीप विठ्ठल बराट वय 39 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदनगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 528 भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 नुसार ज्ञानदेव लक्ष्मण गारुडकर राहणार अकोळनेर तालुका नगर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सब इंस्पेक्टर अशोक सानप करत आहेत.

