पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्र वनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीतील शततारका नक्षत्राचा पर्यायी वृक्ष आपटा (Bauhinea racimosa) हा आहे.
आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्यासाठी या झाडाची पाने वापरतात. प्रामुख्याने पश्चिम घाटमाथा तसेच पूर्वेकडच्या डोंगर उतारावर महाराष्ट्रात सर्वत्र हा वृक्ष आढळतो.
सरासरी ५०० ते २५०० मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमानाच्या प्रदेशात हा वृक्ष ३८ ते ४८ सेंटिग्रेड तापमानात हलक्या, मुरमाड, दगडाच्या, काळ्या पोयट्याच्या अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो.आपट्याची साल खडबडीत काळ्या रंगाची गडद चॉकलेटी अशी असते.
आपट्याची पाने गोलाकार हृदयाच्या आकाराची, उंची पेक्षा रुंदीने जास्त ३.८ ते ५.०० सेंटीमीटर आकाराची, ७ ते ९ शिरा /रेषा असलेली व पानाचा मधला भाग निम्म्यापर्यंत खाली बसलेला असतो.पान हृदयाच्या आकाराचे असते.
पानामध्ये 10 ते 16 टक्के कच्ची प्रथिने असतात त्यामुळे पशुखाद्य म्हणून हे चांगले असते एका पूर्ण वाढ झालेल्या झाडापासून 20 किलो हिरवा चारा मिळू शकतो. आत्याची फुले मार्च-एप्रिल महिन्यात येतात. पिवळट पांढरी १.३ सेंटीमीटर लांब असतात.
आत्याची फळे शेंगा स्वरूपात १५ ते ३०.५ सेंटीमीटर लांबीची व पर्यंत रुंद, १० ते १२ चॉकलेटी रंगाच्या बिया असलेली असतात. शेंगा नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान येतात व फेब्रुवारी मार्चपर्यंत वाळतात.
आपट्याच्या लाकडाचे लाकूड टिकाऊ बळकट टणक असते. यांचा वापर शेती अवजारासाठी तसेच सरपणासाठी करतात. आंतर सालीपासून टिकाऊ दोर बनवतात.पानांचा वापर विधी तयार करण्यासाठी होतो आप्ता हा तुरट आंबट व शीतल असून वात-पित्त-कफ अदाह कंठरोग रक्तविकार अतिसार यामध्ये उपयोगी असतो डोके दुखत असल्यास कोवळ्या पानाचा लेप द्यावा. लघवीतून खर पडत असेल, मुतखडा असेल तर कोवळ्या पानांचा रस व दूध देतात.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान

