shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांचे प्रयत्नाला अखेर यश महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्थांचे उपोषण सुटले..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह🖋️ वृत्तसेवा राहुरी तालुका प्रतिनिधि-दिपक हरिश्चंद्रे.
राहुरी: राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गेलेल्या असल्याने अनेक वर्षापासुन त्यांनी विद्यापीठात नोकरीसाठी सामावुन घेण्यासाठी लढा देत होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. दिनांक 30/08/2021 पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण विद्यापीठ प्रकल्पग्रस्त कृती समितीने सुरु केले होते. 
;काल एका प्रकल्पग्रस्ताची व्यक्तीची तब्येत अचानक बिघाडल्याने त्यास जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आल्याने उपोषणकर्ते अधिक आक्रमक झाले होते. आज दिनांक ०२ सप्टेंबर चौथ्या दिवशी हे उपोषण सुरू असतांना याघटनेची त्वरीत दखल घेवुन राज्यमंत्री नामदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मा कृषिमंत्री दादाजी भुसे यांना दुरध्वनीवरुन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत व  उपोषणा बाबत सविस्तर चर्चा करुन मार्ग काढण्याचे सांगितले. यानंतर नामदार तनपुरे यांचेशी उपोषणकर्ते प्रकल्पग्रस्त पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली यावर तनपुरे यांनी मंत्री भुसे यांचेबरोबर बैठक घेवुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे हस्ते लिंबु पाणी देवुन उपोषण सोडण्यात आले.             
       तसेच नामदार तनपुरे यांनी चालु असलेल्या उपोषणा विषयी काल मंत्रालयात माहिती देवुन विद्यापीठ प्रकल्पग्रस्त बाबत सविस्तर चर्चा करून बैठक लावण्याचे सांगितले होते.
           यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे            मा कुलसचिव प्रमोद लहाळे साहेब यांनी आज उपोषण कर्त्यांना भेट देऊन उच्च स्तरीय बैठक मुबंई घेवुन येथे येत्या ८ दिवसात विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांचा नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे.सदरची चर्चा झालेनंतर मा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे व कुलसचिव यांच्या शब्दाला मान देऊन सदर उपोषण मागे घेत आहे असे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष संतोष पानसंबळ यांनी जाहिर केले. या वेळी उपाध्यक्ष विजय शेडगे यांनी सांगितले की येत्या आठ दिवसाच्या आत बैठकीमध्ये या विषयावर सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे  अन्यथा  २० सप्टेंबर नंतर राहुरी विद्यापीठ येथे तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल, तसेच राहुरी तालुक्यातील सहा गावाचा हा जो प्रश्न आहे हा शेतकऱ्यांना विद्यापीठ प्रशासनाने त्वरित योग्य कार्यवाही करुन सोडवावा असे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे संघटक सम्राट लांडगे यांनी सांगितले, 
या वेळी सचिव राहुल शेटे, सहसचिव श्रीकांत बाचकर, अक्षय काळे, लक्ष्मीकांत वाघ, यांनी देखील प्रशासनाने योग्य कार्यवाही करण्याची मागणी देखील केली, या वेळी सदर उपोषण सोडणे साठी राज्यमंत्री मा प्राजक्त तनपुरे ,जिल्हापुनर्वसन अधिकारी श्रीमती. पल्लवी निर्मळ ,  कृषी विद्यापीठ कुलसचिव मा. प्रमोद लहाळे , राहुरी पंचायत समितीचे मा. उप सभापती रवींद्र आढाव, सदस्य मा.उपसभापती बाळासाहेब लटके, प्रदीप तनपुरे सर,सोमनाथ हापसे, मुळाधरण ग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मारुती बाचकर व इतर अधिकारी, पदाधिकारी व राहुरी विद्यापीठ चे  सर्वच प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे  (राहुरी- तालुका प्रतिनिधी )📲7350591600
close