shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र शासनाच्या धोरणा विरोधात आशा कर्मचारी संघटना नगर जिल्हा यांनी पुकारला एकदिवसीय संप



प्रतिनिधी : संजय वायकर

 अ. नगर : दि .२४ / अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना जिल्हा अहमदनगर यांच्या मार्फत व आयटक देशव्यापी संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी अँड .सुधीर टोकेकर यांच्या मार्गदर्शना खाली आशा स्वयंसेविका यांचा विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला.

मानधनी , कामावर आधारीत मोबदला आदी सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कर्मचारी यांत व विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्रत्येक  पी .एच .सी. मधील मेडिकल ऑफिसर व अहमदनगर जिल्हा परिषद येथे निवेदन देण्यात आले. 

या संपाच्या काही मागण्या आहेत .


सर्व आशा व गटप्रवर्तक यांना कोविड कामकाज करताना सुरक्षा साधने पुरवण्यात यावीत . 

दि. १७ जुलै २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्य निधीमधून आशा वर्कर यांना २००० रुपये व गटप्रवर्तक यांना ३००० रुपये मोबदल्यात वाढ केली मात्र एप्रिल २०२१ ते सप्टेंबर २०२१ अखेरचा मोबदला दिला नाही, तो ताबडतोब देण्यात यावा.

 मा.वंदना गुरनानी, अतिरिक्त सचिव व संचालक एन.एच.एम. दिल्ली यांचे दि.२०/०४/२०२० च्या आदेशानुसार कोविड काळात आशा व गटप्रवर्तक यांचे कोणत्याही प्रकारे मानधनात कपात करु नये, या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. दि. १ एप्रिल २०२१ पासूनच्या ७२ कामाचा आशा स्वयं सेविकांचा थकित मोबदला त्वरीत देण्यात यावा.

सी.एच.ओ. च्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात, जेथे सी.एच.ओ. नाही तेथे आशा वर्कर यांना काम करावे लागते मात्र मोबदला दिला जात नाही, तो आरोग्य वर्धिनी या नावाने असणारा आशांना १००० रुपये मोबदला फरकासह द्यावा .

 २०१० पासून आशा व गटप्रवर्तक यांना सातही दिवस वेगवेगळी कामे करावी लागतात म्हणून त्यांना कायम कर्मचारी दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यानुसार मानधन देण्यात यावे.

आशा व गटप्रवर्तक यांना सन्मानाची वागणूक द्यावी. आशा व गटप्रवर्तकांवर हल्ला झाल्यास त्याची शासनामार्फत त्वरीत दखल घेऊन हल्ला करणान्यास अटक करुन खटला दाखल करावा.

कोविड काळात बाधित आशा व गटप्रवर्तक यांचे न दिलेले मानधन त्वरीत देण्यात यावे. 

आरोग्य वर्धिनीमध्ये गटप्रवर्तक यांना सामावून घ्यावे. 

 सॉफ्टवेअरचा मोबदला गटप्रवर्तक यांचा कट न करता बराला देण्यात यावा.

अहमदनगर महानगरपालिका व जिल्ह्यात ज्याठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद मधील आशा व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाच्या आरोग्य खात्याने त्यांना आशा व गटप्रवर्तकांना जे मानधन दिले आहे तेच मानधन वरील पालीकेमधील कर्मचाऱ्यांना देण्यात यावे .

सदर मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे .

यावेळी देवगावचे रूपाली घुसाळे ,सुरेखा पाखरे,सोनाली धाडगे ,टाकळीकाझीचे अनिता गांगर्डे ,आशा फुंदे ,दिपाली शिंदे ,मेहकरीचे शोभा थोरात , छाया  चांदणे ,निलम पवार, म. न .पा .चे अनिता अर्णे, सुरेखा भुजबळ चासचे अर्चना आगरकर ,सुनिता साळवे , टाकळी खातगावचे स्वाती नरवडे ,अनिता रोकडे आदि आशा सेविका उपस्थित होत्या.
close