पिंपरी चिंचवड:- दिनांक ०३/०६/२०२१ रोजी नाशिकफाटा ब्रिज जवळील पिंपळे गुरव पुणे येथील चालु बांधकाम साईडवरील ५,००,००० / - रुयपे किंमतीचे साहित्य कोणीतरी अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करुन नेल्याने सांगवी सांगवी पोलीस ठाणे पिं.चिं . येथे गु.र.नं .१ ९ ० / २०२१ भा.द.वि. कलम ४५४,४५७.३८० प्रमाणे गुन्हा दाखल असताना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो सुनिल टोणपे यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याचे अनुषंगाने सांगवी पोलीस ठाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना दिल्याा
दिनांक १७ / ९ / २०२१ रोजी तपास पथकातील पोलीस हवालदार ७६६ भिसे , पोलीस नाईक १५७६ नरळे व पोलीस नाईक १६७७ देवकांत यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , दाखल गुन्हा करणारे संशयीत आरोपी हे विशाल नगर पिंपळे निलख, पुणे येथे येणार असल्याचे माहिती मिळाल्याने त्यांनी सदर बातमीचा आशय तपास पथकातचे अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सतिश कांबळे यांना दिला असता त्यांनी मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो सुनिल टोणपे यांना दिला असता त्यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सतिश कांबळे , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , पोलीस नाईक अरुण नरळे , शशिकात देवकांत व पोलीस शिपाई हेमंतकुमार गुत्तीकोंडा असे शिवसागर हॉटेल विशालनगर पिंपळे निलख परिसरात सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे दोन इसम शिवसागर हॉटेलजवळ आले असता त्यांना ताब्यात घेवुन त्यांचा नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचा नाय व पत्ता १ ) समीर छोटे अली खान वय २३ वर्षे , रा . के . / ऑ . माजिद , साहिल हॉटेलजवळ संजय पार्क विमानगनगर पुणे . मुळ गाव फैजुल्ला खान मोहल्ला दरभंगा , राज्य बिहार २ ) निहाल उर्फ फिरोज बरकत शेख वय २८ वर्षे रा . के . / ओं . माजिद , साहिल हॉटेलजवळ संजय पार्क विमानगनगर पुणे . मुळ रा . बेरीया नरकटिया गंज , ठाणा शिकारपुर जि , बेतिया राज्य बिहार असे असल्याचे सांगितले असता त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना सांगवी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे आधिक चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन पोलीस कोठडीत असताना त्यांचेकडे तपास करुन त्यांनी दाखल गुन्हयातील चोरी केलेले सॅनेटरी साहित्य हे त्यांनी यातील आरोपी नामे रावसाहेब पंढरीनाथ सुर्यवंशी रा . कचरेवाडी ता.तासगाव जि . सांगली , याला विक्री केले असल्याचे दाखल गुन्हयात भा.द.वि.कलम ४११ प्रमाणे कलम वाढ करुन चोरी माल घेणारा आरोपी रावसाहेब पंढरीनाथ सुर्यवंशी यास अटक करुन त्यांचे आणखी एका साथीदाराला अटक करुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले सॅनेटरी साहित्य व गुन्हयात वापरलेले वाहन असे एकुण १३,८८,००० / - रुपये किंमतीचे सॅनेटरी साहित्य व गुन्हा करण्याकामी वापरण्यात आलेले दोन छोटा हत्ती टेम्पो जप्त करण्यात आले आहे .
सदरची कामगीरी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश सो , मा . अपर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे साो . मा . पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्री आनंद भोईटे सो , मा . सहा . पोलीस आयुक्त वाकड विभाग श्री श्रीकांत देसले सो , यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस ठाणे श्री सुनिल टोणपे , व तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक सतिश कांबळे , पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे , कैलास केंगले , सुरेश भोजणे , पोलीस नाईक अरुण नरळे , शशीकांत देवकांत , नितीन खोपकर , अनिल देवकर , प्रमोद गोडे , विवेक गायकवाड , प्रविण पाटील , विजय मोरे , सागर सुर्यवंशी , हेमंत हंगे व पोलीस शिपाई हेमंतकुमार गुत्तीकोंडा , शिमोन चांदेकर , सुहास डंगारे व परिमंडळ २ ऑफिसमधील नुतन कोंडे यांनी केली आहे .

