shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कंधार तालुक्यातील कृषी मंडळा अंतर्गत शासकीय योजनेमध्ये झालेल्या कामाची खातेनिहाय चौकशी करावी-जाधव व्यंकटी यांची मागणी..!



कंधार तालुक्यातील कृषी मंडळा अंतर्गत नानासाहेब देशमुख कृषि संजिवनी ( पोखरा ) उदा . ठिबक,तुषार व एम.आर अंतर्गत फळबाग लागवड या शासकीय योजनेची कामे..!!

कंधार । प्रतिनिधी :-
कंधार तालुक्यात कृषि मंडळ अंतर्गत नानासाहेब देशमुख कृषि संजिवनी ( पोखरा ) उदा . ठिबक, तुषार व एम.आर. ई.जी. एस अंतर्गत फळ बाग लागवड या शासकीय योजनेमधील कामांमध्ये गैर व्यवहार केले असुन सदरील योजना मंजुर होण्या अगोदरच शेतक-या पासुन कोरे चेक काढुन घेतले,व त्यांच्या नावावर आलेले शासकीय अनुदान हे आपण स्वतःहून उचलुन घेतले आहे. 

ज्या शेतकर्यांना ठिबक लॅडरवर सि.एम.एल.नंतर नाहीत आणि तुषार संचातील पाईपावर शेतक-यांच्या नावाची सिम्बांलीग नाहीत व एम.आर. जी.सी. च्या फळबागा लागवड योजने मध्ये झाडे नाहीत तरी सदरील कामाची चौकशी हि लवकरात लवकर होऊन शेतक-यांना न्याय मिळवून देऊन उपकृत करावे.अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जाधव व्यंकटी, गोविंद मराठवाडा उपाध्यक्ष माहिती अधिकार तपास समिती,माधव वडजे,मामडे गिरीश.पांडुरंग कंधारे, शरद गायकवाड यांनी केली.
close