कोणाला कधीही काही ही आडचण आली तर तूमच्या मुलाला आवाज द्या - नानासाहेब खरात.
खोरीची येथे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मार्गदर्शन .
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२५ सप्टेंबर२०२१)तेजप्रुथ्वी ग्रुप सर्वच ठीकाणी आडचणीच्या काळात धावून जातो आणि हे तर माझ गाव आहे. कोणाला कधीही काही ही आडचण आली तरी तुम्ही या. तूमच्या मुलाला आवाज द्या. असे तेज पूर्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात यांनी संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना खोरोची गावातील ग्रामस्थांना संबोधित (दि.२४ सप्टें) रोजी केले.
खोरोची येथे संजय गांधी निराधार योजनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष सागर(बाबा) मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व तेजप्रुथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजने अंतर्गत गावतील विधवा, परित्यक्ता, अपंग, वयोवृद्ध याना संजय गांधी निराधार योजने संदर्भातील अर्ज कसे भरावेत. त्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी खोरोची परिसरातील वृद्ध महिला- पुरुष दिव्यांग निराधार यांना मार्गदर्शन मिसाळ यांनी केले .
तसेच लघु उद्योगा साठी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज कसे मिळवता येईल याची ही माहिती देण्यात आली.
यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की, खोरोची हे माझे गाव आहे या गावातील माझे सर्व माता पिता वडीलधारी बंधू-भगिनी व गोरगरीब यांनी कसली ही अडचण आली तरी तेजपृथ्वी ग्रुपच्या सदस्यांना आवाज द्या. आम्ही कोणतेही राजकारण करत नाही कोण कोणत्या पक्षाचा कोण कोणत्या जातीचा हे न पाहता जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून केली जाईल. तेजप्रुथ्वी ग्रुप सर्वच ठीकाणी आडचणीच्या काळात धावून जातो आणि हे तर माझ गाव आहे. कोणाला कधीही काही ही आडचण आली तरी तुम्ही या. तूमच्या मुलाला आवाज द्या. यावेळेस रेहणाताई मुलानी, युवा नेते संपत सरक, उमेश चव्हाण, अशोक घोडके तेजप्रुथ्वीप ग्रुपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे हे उपस्थित होते.
यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपचे कार्याध्यक्ष तानाजी हेगडकर यांनी संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारे फॉर्म व झेरॉक्स ला होणारा खर्च तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून स्वतः करण्याची जबाबदारी घेतली .
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तेजपृथ्वी ग्रुपचा इदांपुर तालुका महिला अध्यक्षा अर्चनाताई गोरड यांनी केले.तर सूत्रसंचालन कुमार साठे यांनी केले. यावेळेस गावातील माजी पोलीस पाटील भिमराव पाटील ,कैलास देवकर ,आबा साठे ,जौजांळ माँडम हे व ईतर मान्यवर उपस्थित होते

