नगर कोतवाली पोलिस ठाण्याचा पो .नि . संपत शिंदे यांच्याकडे पदभार
प्रतिनिधी : आसावरी वायकर
अ. नगर : २५ / नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याचे नवीन कार्यरत पो. नि . संपत शिंदे यांनी शुक्रवार दि .२४ रोजी पदभार स्विकारला .
कोतवाली पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत पो .नि .संपत शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख करून घेण्यात आली.
यापूर्वी पो. नि . संपत शिंदे हे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे कार्यरत होते . शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता पदभार स्विकारताच त्यांनी पोलिस ठाण्यातील कामकाजाची माहिती घेतली .
सर्व पोलिस कर्मचाऱ्यांमार्फत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

