shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चंद्रकला गदळे यांचे निधन..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                            
केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव चंद्रकला सखाहरी गदळे यांचे बुधवारी (दि.२२) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५७ होते.

गेल्या १५ दिवसांपासून अल्पशा आजाराने त्या त्रस्त होत्या. उपचारादरम्यान औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 


त्यांच्यावर दहिफळ वडमाऊली येथील शेतात बुधवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुन, नातवंडे असा परीवार आहे. त्या शिवकृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.सखाहरी गदळे यांच्या पत्नी व मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते राहूल गदळे यांच्या मातोश्री होत. गदळे कुटुंबियांच्या दुःखात दैनिक शिर्डी एक्सप्रेस  परिवार सहभागी आहे.
close