----------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
पुण्यातून कार चोरी करून पळून जात असलेले आरोपी केज पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
या बाबतची माहिती अशी की, पुणे परिसरातून अज्ञात आरोपीनी एक इको कंपनीची कार पळविली. या बाबत पुणे पोलिसांनी बीड पोलिसांना माहिती देताच संशयित चोरांचे व वाहन यांचे मोबाईल लोकेशन हे केज तालुक्यातील पिंपळगाव फाटा येथे असल्याची माहिती सायबर ब्रँचचे पोलीस नाईक अनिल मंदे याना मिळाली. मंदे यांनी तात्काळ ही माहिती केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली.
सपोनि शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांनी पोलीस स्टेशन समोर पोलीस जमादार नागरगोजे, पोलीस नाईक अनिल मंदे, महिला पोलीस नाईक धायगुडे, महिला पोलीस शिपाई जाधव यांनी सापळा लावला. त्या वेळेस बीड कडुन सदर संशयित कार क्र. (एमएच-१४/जीक्यू-२२२९) ही येत कार येत असताना दिसली. संशयित गाडी दिसताच पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी सदर गाडी अडवून गाडीतील संशयीत दोघे परमेश्वर सिताराम विढे वय (२५ वर्षे) रा. साकुड ता. अंबाजोगाई जि. बीड व हेमंत भरत चौधरी वय (२८ वर्षे) रा. रूपीनगर तळवडे, ता. हावेली जि.पुणे यांना गाडीसह ताब्यात घेतले. कार चोरीतील संशयित आरोपी हे कोठडी सुरक्षे वरील जमादार थोरात यांच्या ताब्यात आहेत.
पुणे परिसरात चोरी झालेली गाडी केज पोलिसांनी शिताफीने पकडल्यामुळे केज पोलिसांचे कौतुक होत आहे.

