हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२५,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा, हिवरखेडा ,खडकी, धोतरा ,केलसुला, घोरदरी, कापडसिंगी, बन, बर्डा, धानोरा, सालेगाव, उटी पूर्णा या सह परिसरात मागील आठ दिवसापासून सतत धार, मुसळधार तसेच अतिवृष्टी ढगफुटी सारखा पाऊस चालू असल्यामुळे, शेतकऱ्याचा तोंडातला घास हिरावला गेला आहे,
यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस चांगला असल्यामुळे शेतात पीक हे चांगले बहरले होते, मात्र संततधार पाऊस चालू असल्यामुळे शेतातील उभ्या पिकाचे खूप नुकसान झाले आहे, यामुळे शेतकरी वर्ग मोठा आर्थिक विवंचनेत सापडला आहे, गेल्या वर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले, यावर्षी सुद्धा असेच असल्यामुळे, शेतकऱ्यांसमोर समस्येचा मोठा डोंगर उभा राहिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे संबंधित विभागाने आणि पिक विमा कंपनीने दखल घेऊन सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी
प्रतिक्रिया
गेल्या आठ दिवसा पासून हिंगोली जिल्ह्यासह सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आता आलेल्या उभ्या सोयाबीनला कोंब फुटत आहेत उडीद मूग तर गेलेच आता मुख्य पीक सोयाबीन देखील अतिवृष्टीमुळे गेले आहे मात्र अद्यापही पिक विमा कंपनीचे कोणतेही अधिकारी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आले नाहीत आणि महसूल प्रशासनाच्या वतीने देखील अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही सेनगाव तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा.
निळकंठ भादलकर
शेतकरी सेना साखरा सर्कलप्रमुख ता.सेनगाव जि.हिंगोली

