shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बावडा येथील हर्षल भगवान घोगरे युपीएससी परीक्षेमध्ये ६१४ क्रमांकाने उत्तीर्ण.बावडा गावासह इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यामध्ये घोगरे यांचे विशेष कौतुक.

बावडा येथील हर्षल भगवान घोगरे युपीएससी परीक्षेमध्ये ६१४ क्रमांकाने उत्तीर्ण.

बावडा गावासह इंदापूर तालुका व पुणे जिल्ह्यामध्ये घोगरे यांचे विशेष कौतुक.

इंदापूर प्रतिनिधी: (दि.२५ सप्टेबर २०२१)इंदापूर तालुक्यातील बावडा गावामधील प्रथमच युपीएससी परीक्षेमध्ये भारतामध्ये६१४ क्रमांक मिळवून यशस्वी झाल्याबद्दल गावातील ग्रामस्थांकडून त्यांचे विशेष कौतुक करून सत्कार(दि.२४ सप्टेंबर) रोजी करण्यात आला.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील हर्षल घोगरे. त्यांचे वडील ग्रामसेवक असून आई गृहिणी आहेत. ते सध्या बावडा येथील घोगरे वस्ती या ठिकाणी राहत असून त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली ते दुसरी जिल्हा परिषद शाळा इंदापूर .तिसरी ते चौथी अकलूज समावी. त्यानंतरचे दहावी पर्यंत शिक्षण शांती निकेतन विद्यालय सांगली या ठिकाणी झाले. तर अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती या ठिकाणी झाले .त्यांनी बी टेक पदवी वालचंद कॉलेज सांगली याठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर ते दिल्ली येथे यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासासाठी गेले असता त्यांनी अथक परिश्रमातून भारतामध्ये यूपीएससी परीक्षेत ६१४ क्रमांक मिळवत आपले नावलौकिक करून प्रशासकीय सेवेमध्ये राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळवली .त्यांच्या या यशाबद्दल बावडा ग्रामस्थांसह इंदापूर तालुका व महाराष्ट्रातील तमाम मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

रात्री ( दि. २४ सप्टेंबर ) रोजी येथील निकाल समजल्यानंतर बावडा गावातील अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष  पवन घोगरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस सचिन सावंत, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख, बावडा सकाळ वृत्तपत्राचे दीपक शिंदे व गावातील व घोगरे वस्ती येथील ग्रामस्थ यांनी हर्षल घोगरे व त्यांचे आई संगीता भगवान घोगरे व वडील भगवान श्रीमंत घोगरे यांचा सत्कार करून पेढे भरून  आनंद व्यक्त केला.
close